पौष्टीक खा - सदृढ रहा....

सध्याच्या परिस्थितीमध्ये पैसे खर्च करूनही चांगले पदार्थ खायला मिळत नाहीत, अशी ओरड ऐकायला मिळते. व्यापाऱयाकडून एखादी वस्तू खरेदी करताना मोठी रक्कम मोजूनही भेसळयुक्त वस्तू मिळणार असेल तर ते आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे. यामुळे अन्नामध्ये भेसळमुक्त पदार्थ असणे गरजेचे आहे.

थेट शेतकऱ्यांकडून माल मिळाला तर तो भेसळमुक्त असू शकतो. परंतु, शहरी भागामाध्ये शेतकऱ्याचा माल मिळतो कुठे? यामुळेच दर जास्त पैसे मोजूनही चांगले पदार्थ मिळत नाहीत. यामुळे आरोग्य भिगडते आणि दवाखाना सुरू होतो. दोन्ही बाजूंनी नुकसानच होते. यामुळे थेट शेतकऱ्यांकडून वस्तू मिळाल्या तर नक्कीच फायदा होणार आहे. यामुळे कमी दरात आरोग्य चांगले राहू शकते. म्हणूनच आम्ही ही सेवा सुरू करत आहोत, आणि पौष्टीक खा... सदृढ रहा असेच म्हणणार आहोत....

सध्याची आरोग्यातची परिस्थीती काय आहे?
  • प्रत्येक ४ भारतीयात १ मधुमेही आहे किंवा मधुमेहाच्या वाटेवर आहे.
  • १५ करोड लोक स्थुलतेच्या व्याधीने त्रस्त आहेत.
  • त्यात ३० टक्के पुरुष व ५० टक्के स्त्रिया शहरी भागातील आहेत
  • बालकांमध्ये हि स्थूलता वाढत आहे
  • थकव्याचा अनेकांना त्रास होत आहे.
  • पचनाचा अनेकांना त्रास.
शरिरासाठी निकृष्ठ पदार्थ हे हानिकारक ठरतात...

ग्राहकांच्या आरोग्याचे काहीही होवो पण तर मालाला चांगली किंमत यावी, यासाठी काय-काय केले जाते ते पहा...

  • सुंदर रंगासाठी हानिकारक रंग व रसायने वापरली जातात. जसे कि शिसे, पारा, (या मुळे ईकोलाय, सेल्मोनेल या ग्राम निगेटिव्ह ब्याक्टेरीयाचे पोषण होते हे लहान मुलांसाठी फारच घातक ठरतात), क्वापर सल्फेट हे कारले व पाले भाज्या हिरव्या गार दिसाव्यात म्हणून वापरतात. परंतु, शरीराच्यादृष्टीने अपायकारक ठरतात.
  • वांगे चमकदार दिसावेत म्हणून निकृष्ट दर्जाचे तेल चोळतात.
  • गाजर लाल दिसावे म्हणून लाल रंगाचे पाणी वापरतात.
  • कलिंगडाला इंजेक्शन देऊन लाल केले जाते.
  • केळी व अंबा कार्बईड द्वारे पिकवली जातात.
शेतकरी हे करतात का?

शेतकरी हे कधीच करत नाहीकारण त्यांना त्यांच्या मालाचा चांगला भाव मिळावा म्हणून ते ताजा शुद्ध मालच विकायला आणतात.जेव्हा तो माल एकाकडून दुसरीकडे मध्यस्थांमार्फत जात असल्यामुळे त्याचा ताजेपणा कमी होतो. ताजेपणा टिकवण्यासाठी किंवा नफेखोरीसाठी त्यावर विविध प्रयोग केले जातात. माल खराब होऊ नये म्हणून नुट्रीएंट्स काढून घेतले जातात. माल चांगला दिसण्यासाठी पॉलिश केली जाते, कलर केमिकल्स टाकले जातात, रासायनिक प्रक्रिया केल्या जातात आणि दरम्यान नफेखोरीसाठी भेसळ होण्याची दाट शक्यता असते.

पौष्टीक खा... सुधृड राहण्यासाठीच पारदर्शक सेवा आम्ही सुरू करत आहोत. यामधून शेतकरी व ग्राहकांचाच फायदा होणार आहे, यात कोणतीही शंका नाही.

fresh-flavor
fresh-flavor
fresh-flavor
fresh-flavor
fresh-flavor
अन्नभेसळ म्हणजे काय?

अन्न पदार्थांमध्ये भेसळ केल्यामुळे आरोग्याला नक्कीच धोका पोहचू शकतो. एखादी वस्तू खरेदी करताना मोठी रक्कम मोजूनही भेसळयुक्त पदार्थ मिळत असतील तर आरोग्याच्या दृष्टीने ते चुकीचे आहे.

भेसळ प्रतिबंधक कायद्याप्रमाणे पुढील बाबींना भेसळ म्हणतात. :

अन्नपदार्थातील काही घटक काढून घेणे. उदा. दुधातील स्निग्धांश काढून घेणे,दुधात डिटर्जेन्ट, स्टार्च , युरिया, सोयातेल मिक्स करणे, उकडलेल्या बटाट्याचे क्रीम, स्टार्चई. तुपात मिक्स करणे, इतर तेले नारळाच्या तेलात मिक्स करणे, कस नसलेल्या लवंगा चांगल्या लवंगात मिसळवणे, हळदीत कृत्रिम रंग घालणे, साखर, गुळाची काकवी मधात मिसळविणे, खडूची पावडर साखरेत, गुळात मिसळवणे, ऍल्युमिनिअमची पाने सिल्वर पानात मिठाईसाठी मिसळविणे, लवंगा- वेलदोडयातील अर्क काढून घेणे. हिरव्या रंगात मटार, भेंडी, मिरच्या ई. भाज्यांना बुडवून काढणे, चिकणमाती, कलर चहापावडर व कॉफीमध्ये मिक्स करणे, एखाद्या अन्नपदार्थात कमी प्रतीचा माल मिसळणे. सेला बासमती तांदुळात हळदी मिसळविणे, तांदुळामध्ये सेन्ट मारून पॅकिंग करणे. मिठामध्ये खडूची भुकटी टाकणे. गोडेतेलात करडईचे, सोयाबीनचे तेल मिसळणे, शुध्द तुपात वनस्पती तूप मिसळणे. अन्नपदार्थात अपायकारक पदार्थ मिसळणे. मिठाईत विषारी रंग मिसळणे, मूळ पदार्थाऐवजी बनावट माल वापरणे. केशराच्या ऐवजी मक्याच्या कणसाचे रंगवलेले तुरे वापरणे. चहाच्या ऐवजी लाकडाचा भुसा रंगवून वापरणे, पपई बिया, ब्लॅक बेरीई. ब्लॅक पपेरमध्ये टाकणे, सोपस्टोन किंवा अन्य माती हिंगामध्ये टाकणे, साखर मिसळण्याऐवजी एक दुसराच गोड पदार्थ (सॅकरिन) मिसळणे. एखाद्या अन्नपदार्थात सडलेले, कुजलेले, खराब किंवा किडलेले पदार्थ असणे. लाकडी भुसा, सिन्थटिक कलर मिरची पावडर मध्ये मिक्स करणे, एखाद्या पदार्थात मर्यादेपेक्षा जास्त अयोग्य रंग मिसळलेला असणे. एखाद्या पदार्थात ते टिकवण्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त रासायनिक अंश सापडणे.कायद्याने ठरवून दिलेल्या पदार्थांऐवजी दुसराच पदार्थ मिसळणे. ठरलेल्या गुणवत्तेपेक्षा कमी गुणवत्तेचा पदार्थ असणे. इत्यादी गोष्टींना भेसळ म्हणतात.

आर्थिक फायदा सर्वांनाच व्हावा...

शेतकऱ्यांकडून वस्तूची खरेदी करताना आम्ही पुर्णपणे तपासणी करूनच घेणार आहोत. यामुळे ग्राहकांना उच्च दर्जाची वस्तू मिळणार, यात मुळीच शंका नाही. शेतकरी व ग्राहक यामध्ये दुसरे कोणीच नसल्यामुळे आर्थिक फायदा दोघांचाही होणार तर आहेच. शिवाय, आरोग्याच्या दृष्टीने चांगली वस्तू मिळणार. हे सर्वांत महत्वाचे आहे.

ग्राहकांसाठी सेवा
  • थेट घरपोच सेवा
  • कॅश ऑन डिलिव्हरी ,ऑनलाइन बुकिंग आणि पेमेंट सेवा
  • मागणीनुसार पुरवठा
  • आगाऊ वस्तूंची हंगामानुसार मागणी करता येणार
  • प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग सुविधा
  • कॉलसेंटर सुविधा
  • चोखंदळ ग्राहकांसाठी उच्च दर्जाच्या वस्तूची हमी