शेती एक यशस्वी उद्योग होऊ शकतो

शेती या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा जसा विकास होत गेला तसाच हा व्यवसाय अधिक गुंतागुंतीचा होत गेला. त्यामुळे शेती व्यवसायात हिशोब, नियोजन व अंदाजपत्रक इत्यादी बाबींना महत्त्व प्राप्त झाले. काही शेतकरी खरेदी-विक्री, खर्च-उत्पन्न इत्यादी बाबींची नोंद ठेवून शेती व्यवसाय करतात. शेती व्यवसायातील कोणत्या उपक्रमातून किती फायदा-तोटा झाला हे हिशोब ठेवल्यामुळे समजते. पुढच्या वर्षाचे नियोजन करता येते.

शेती उद्योग यशस्वी होण्यासाठीः
  • शेती व्यवसायाचे नियोजन नियोजन महत्वाचे.
  • शेती व्यवसाय करताना उत्पन्नाचा अंदाज महत्त्वाचा.
  • उत्पादन कोठे व केव्हा विकावे, उत्पादित माल किती दिवस गोदामात ठेवावा याची माहिती असावी.
  • उत्पादन तंत्रात नियोजन केल्यामुळे शेती व्यवसायाच्या उत्पादनात वाढ होते. नियोजन एक शिक्षणाचे हत्यार आहे
  • शेती व्यवसायाचा कारभार नीट चालविण्यासाठी खर्च, उत्पन्न, माहिती गोळा करणे, हवामानाचा अंदाज, व्यवस्थापनातील सल्ला, कराराची शेती इत्यादी शेती व्यवसाय व्यवस्थापनात विचार होणे आवश्यक.
  • शेतीचे अंदाजपत्रक महत्त्वाचे ठरते.
  • शेतीला जोडधंदा महत्वाचा ठरतो.
  • गायी, म्हशी, शेळ्या यांच्या कळपानुसार त्यांचे स्वतंत्र खर्च उत्पन्न व नफा असे पत्रक बनवणे आवश्यक

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वस्तुस्थिती संदर्भ कृषी विज्ञान केंद्र, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतकरी’ शेती शाळांचे अशा विविध उपक्रमातून प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच सर्व पिके व जोडधंदे यास चांगले महत्त्व दिले जात आहे. या प्रशिक्षणात शेती व्यवसाय व्यवस्थापन या विषयास महत्त्व देण्यात आले आहे. तसेच शेतीचा हिशोब, नियोजन अंदाजपत्रक, शेती भांडवलाचे व्यवस्थापन व बाजार नियोजनाच्या बाबींचादेखील समावेश आहे. त्याचबरोबर घरखर्च व्यवस्थापन कृषी तंत्र विस्तार शिक्षणाचाही समावेश आहे. हा उपक्रम ‘स्त्री’ शेतकर्यां्साठी महत्त्वाचा आहे. अशा पद्धतीने शेती व्यवसायात नक्कीच भरभराट होईल. कारण यात बँक, सोसायटी व बाजार व्यवस्था, सरकारी योजना इत्यादी विषयांवर भर दिला आहे.

यशस्वी शेतीसाठीः

शेतकरी बांधवांनी प्रथम आपले शेत हे एक कंपनी आहे असे ठरवून घ्या. कंपनीला एक चांगले नाव देवून टाका. कंपनीला उद्योग म्हणून नोंद करा. कंपनीचे बँक खाते उघडा. कंपनीचा प्रकल्प अहवाल तयार करा. मग बँक लोन साठी कोणतीही बँक तयार असेल. कंपनी कर्मचारी भरती करा. आपले घरचेच कर्मचारी चालतील. किमान चार तरी असावे.

आपले क्षेत्र ५ एकर असेल तर फारच उत्तम. पाण्यासाठी एक पाच गुंठ्याचे शेत तळे तयार करा. आता आपल्या कंपनीचा पाणी प्रश्न मिटला असेल तर लांबी रुंदी मोजून ९ गुंठे क्षेत्राचे २० प्लॉट तयार करा. सर्व प्लॉट सारखे लांबी रुंदीचे व समोर १० फुट ते २० फुट कच्चा रस्ता तयार करावे. रस्तानंतर केला तरी चालेल. जागा सोडून द्या. आता आपले उत्पादन ठरुवून घ्या. कांदा, मिरची, टमाटे, बटाटे, वांगे, लसुन, पालक, मेथी, कोथांबीर, कोबी, गाजर, वाटाणे, बीट, काकडी, भेंडी, गवार, कारले, भोपळे, दोडके, वाल हे साधारण तीन ते सहा महिने घेणारे वान. आपण आपल्या उत्पादनात लोंकाची गरज व आपली कमीत कमी खर्च व जास्त उत्पन मिळेल असे वान निवडून उद्योग सुरु करावा. पूर्ण वेळ कंपनीला द्या. नक्कीच फायदा होईल.

आपले प्रत्येक उत्पादन हे मर्यादित व चांगल्या प्रतीचे व सेंद्रिय खतापासून तयार झालेले असेल. त्याची गरज सर्वांनाच असेल व गरज हि मागणीची जननी आहे व सर्वच गरजेच्या वस्तू एकाच जागेवर मिळाल्या तर जास्त मागणी असेल. जर चांगला ग्राहक आपल्या शोधात असेल तर कुठली भाजी व फळ काय दरात विकायची हे आपली कंपनी ठरवणार त्यामुळे कुणी आपल्याला दबाव आणू शकत नाही. बहु उपयोगी फळ व भाजीपाला आपण उत्पादन करून शेती मध्ये खरच सोने पिकवू शकतो. पण स्वतः ठरवून टाका मी माल योग्य भाव मिळाला तर विकेल. आपली टिसीजीएल ऍग्रो कंपनी आपल्याला नक्कीच याकामी मदत करेल.

शेतकरी बांधवानो तुम्ही, काय कराल?

शेतकरी बांधवांनी पिकाचे नियोजन केल्यानंतर पिक घेण्यापासून ते काढेपर्यंतची माहिती व छायाचित्रे आमच्याकडे पाठवावीत. यामुळे पुढील नियोजन करणे व ग्राहक मिळविणे सोईस्कर होईल. तुमच्या पिकाची छायाचित्रे व व्हिडिओ पाठविल्यास ती आमच्या वेबसाईट वरून तसेच फेसबुक पेजवरून प्रसिद्ध केली जातील.

  • तुमच्या शेतीपिकाची माहिती आमच्यापर्यंत पोहचवावी.
  • छायाचित्र, व्हिडिओ पाठवावेत.
  • आमच्या स्थानिक प्रतिनिधीशी संपर्क साधा.
  • तुमचा शेतीमाल आमच्यापर्यंत पोहचवा अथवा आम्ही थेट घेऊन जाऊ. दोन्ही सुविधा उपलब्ध.
शेतकरी व ग्राहकांसाठी सेवा

शेतकरी व ग्राहकांना सेवा देण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतामधून थेट ग्राहकाच्या घरापर्यंत विविध वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी आम्ही बांधील राहणार आहोत. यामुळे दोघांचे हित हेच आमचे ध्येय असल्याने पारदर्शक ऑनलाईन सेवेचा जास्तीत जास्त उपयोग केला जाणार आहे.

शेतकऱ्यांसाठी सेवाः
  • शेतकऱ्यांना नेहमीच रास्त भाव मिळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध
  • शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा होणार.
  • शेतकऱ्यांना स्वस्तात खते व बि-बियाने उपलब्ध करून देणार.
  • शेतकऱ्यांचे शंकांचे निरसण करणार.
  • शेतकरी व उद्योजकांना प्रशिक्षण,सल्ला, कृषी तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन
  • पिक व हवामानाविषयी माहिती देणार
  • माती आणि पाणी परिक्षणाविषयी जागृकता वाढविणे
  • शेतकऱ्यांना विविध वस्तूंचा पुरवठा करणे
  • महिला शेतकऱ्यांनी प्रक्रिया केलेला मालास बाजारपेठ उपलब्ध करून देणे
नियम आणि अटी
  • शेतकऱ्यांनी उच्च दर्जाच्या मालाचाच पुरवठा करावा अथवा घेतला जाईल
  • भेसळयुक्त अथवा खराब, भिजलेला माल स्वीकारला जाणार नाही.
  • एखाद्या ग्राहकाची तक्रार आल्यास त्या शेतकऱयाकडील वस्तूंची खरेदी थांबविली जाईल.
  • ग्राहकांच्या मागणीनुसार वस्तूंचा पुरवठा केला जाईल.
  • नियमीत पुरवठा करणाऱया शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
अधिक माहिती साठी संपर्क
fresh-flavor
fresh-flavor
fresh-flavor
fresh-flavor
fresh-flavor