एरंडी

एरंडी हे पीक अवर्षण प्रवण भागात सुद्धा चांगले येणारे आहे. साधारण: ४०० ते ५०० मि. लि. पाऊस पडणाऱ्या भागातही हे पीक येऊ शकते. भारतात एरंडीचे पीक ६.७४ लाख हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते व त्यापासून ८.९९ लाख मेट्रीक टन उत्पादन मिळते. महाराष्ट्रात एरंडीचे क्षेत्र ९००० हेक्टर असून त्यापासून मिळणारे उत्पादन २००० मेट्रीक टन आहे.

एरंडी हे पीक जिरायती तसेच बागायती क्षेत्रात घेतले जाते. कोरडवाहू एरंडी शेताच्या बांधावर तसेच बागायती क्षेत्रात ऊस, मिरची, वांगी, केळी इ. मुख्य पिकाभोवती घेता येते. तसेच हे पीक हलक्या आणि मध्यम खोलीच्या जमिनीत सलगपणे घेता येते. हे पीक सर्वसाधारणपणे लागवडीखाली असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनीत येऊ शकते. या सर्व बाबींचा विचार केल्यास एरंडीची लागवड करणे फायदेशीर आहे.

एरंडीचे उपयोग : एरंडी तेलाचा उपयोग औषधी व घरगुती वापराशिवया वंगण, रंग साबण इत्यादी उद्योगात केला जातो. औद्योगिकदृष्ट्या विकसित राष्ट्रांकडून एरंडी तेलास फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तसेच तेल काढल्यावर राहिलेल्या पेंडीचा उपयोग सेंद्रिय खत म्हणून केला जात असल्याने तिला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

महत्त्व :

एरंडीपासून अनेक उपयोगी वस्तू तयार होतात म्हणून त्याला निसर्गाची भेट म्हणतात. एरंड्याचे विविध उपयोग औषधीकरिता व विविध घरकामाकरिता केले जातात. डोळ्यात जळजळ होणे, गुडघेदुखी, अपचन काविळ, त्वचा व हृदयविकार ह्यावर पान, फुल, बियाण्याचे तेल, मुळांचा रस इत्यादींचा उपयोग करता येतो.

पाने:

पानांमध्ये प्रथिने २५ टक्के, कर्ब ५० टक्के असते. एरंडीची पाने 'इरी रेशिम किड्यांसाठी' एक उत्तम अन्न आहे. जेव्हा ह्या किड्यांना ७५ किलो पाने खाऊ घातली जातात. तेव्हा हे रेशीमकिडे १ किलो रेशीम तयार करू शकतात. हेक्टरी एरंडीला ४५०० किलो पानं येतात. शेतकरी रेशिम उद्योगात रुचि घेत असल्यास रेशीम किड्यांच्या मदतीने ६०० किलो रेशिम तयार होऊ शकते. रेशिम किडे वाळलेली पानेसुद्धा खातात. एरंडीची कोवळी पाने जनावरांसाठी उत्कृष्ट चारा म्हणून वापरता येतात. वाळलेल्या पानांचा चुरा मच्छर, पांढरी माशी इत्यादींना पळवून लावण्याकरिता उपयोगी पडतो, पांढरी माशी इत्यादींना पळवून लावण्याकरिता उपयोगी पडतो. पानं गरम करून जेथे दुखत असेल तेथे गरम पान बांधावे असे पुर्णपणे बरे वाटेपर्यंत करावे.

खोड :

खोडाचा मुख्यत्वेकरून उपयोग इंधनाकरिता होतो. कोवळी खोडे मोडून जमिनीत गाडली जातात, जेणेकरून जमिनीची प्रत सुधारेल. खोडाचा लगदा लिखाण, छपाई, कागद गुंडाळणे इ. करिता उपयोगी असतो. वाळलेले खोड, फांद्या मातीचे घर बांधण्यात उपयोगी पडतात. खोडाचा उपयोग छतासाठी होतो.

बियाणे :

एरंडीची फळे काटेरी व गोलाकार असतात प्रत्येक फळात तीन बिया असतात. बियाण्यांच्या रंगात अतिशय विविधता असते. कोणत्याही दोन बिया सारख्याच रंगाच्या किंवा एकसारख्या नसतात. बियाण्याच्या शंभर दाण्यांचे वजन १० ते १०० ग्रॅमच्या दरम्यान असते. सरासरी वजन ३० ग्रॅम असते. एरंडीच्या बियाण्यांमध्ये ४० - ५५ टक्के तेल, २० टक्के प्रथिने, क्रुड फायबर किंवा सेल्युलोज इ. घटक असतात.

खाद्यपदार्थ म्हणून उपयोग : जरी बियाणे विषारी असले तरी काही विशिष्ट प्रक्रिया करून त्यापासून 'ओजिली इसि' किंवा 'ओनिटशा किंवा ओजिली उगबा ' किंवा 'अवका' असे पदार्थ पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये तयार करतात.

तेल : एरंडीच्या तेलाचे भरपूर व विविध उपयोग असतात. एरंडी तेलाचे एकमेव वैशिष्ट्य हे आहे कि त्यात रिसिनोलिक आम्लपदार्थ असतो. ज्यामध्ये हायड्रॉक्सी (अॅसीड) आम्ल ९० टक्के असते.

औषधी उपयोग :

एरंडेल तेलाने अन्नपचन चांगले होते तसेच महिलांच्या गर्भाशयाशी संबंधित आजार ही बरे होतात, यकृताची क्रिया वेगाने होते. कमी मात्रेत कोमट व शुध्द एरंडेल तेल जसे की लहान मुलांनी १/२ ते १ चहाचा चमचा व मोठ्यांनी २ चहाचे चमचे एक पेला कोमट पाण्यासोबत प्राशन करावे.

हवामान :

एरंडी हे पीक अवर्षणग्रस्त प्रतिसाद देत असल्याने ४० ते ५० सेंमी पर्यंत पाऊस पडणाऱ्या भागातसुद्धा हे पीक चांगले येऊ शकते. एरंडीस उष्ण कोरडी हवा मानवते.

जमीन :

एरंडीचे पीक सर्वसाधारणपणे लागवडीखाली असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनीत येऊ शकते. भारी जमिनीत हे पीक अधिक कालावधी घेऊन जास्त उत्पादन देते.

पूर्व मशागत :

या पिकाच्या मुळ्या जमिनीत खोलवर जात असल्या कारणाने जमिनीचा नांगरट २० ते ३० सेंमी. खोलवर करावी. त्यावर २ - ३ फुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगली तयार करावी, त्यामुळे बियांची उगवण व रोपांची वाढ योग्य प्रमाणात होते. एरंडीच्या सुधारित जाती : एरंडीच्या जातींचा आणि संकर वाणांचा कालावधी / उत्पादन, जमीन, पाण्याची उपलब्धता यानुसार कमी- जास्त होऊ शकते.

कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारी फळे

शेतकरी बदलत्या हवामानानुसार कमी पाण्यात येणार्‍या डाळिंब व बोरी यासारखी फळपिके घेऊन उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापि, रोग, कीड व वाढलेल्या मजुरीमुळे ही पिके आता मागे पडत असून, अनेक शेतकरी पर्यायी पिकांचा शोध घेत आहेत. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणार्‍या व खायला चविष्ट असणार्‍या या पिकाविषयी संशोधन व त्यासाठी बाजारपेठ वाढविण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. उष्ण व कोरड्या हवामान भागात ही फळ चांगले साथ देताना दिसतात. शेतकर्‍यांना चांगल्या प्रकारे त्याची लागवड केल्यास उत्पन्न वाढविण्यासाठी एक चांगला स्रोत तयार होईल.